काळ्या मोत्यांपरी नेत्र हे ! ओठ मानाकांपरी !
सुवर्ण ओतून घडली काया ! कुंतल रेशीमसरी !
संगमरवरी पोट नितळसे ! घट मोहाचे वक्षी !
अवघड वळणे घेवुन फिरली तारुण्याची नक्षी !!
वळणावळणावरी चोरटे नेत्र पाजलुन जागे
आणि तनुवर मिरवित खजिना तुला फिरावे लागे
असे दागिने जडले बाई मोलाचे तव देही
जन्मभराची जोखिम झाली ! कुणा कल्पना नाही !!