Saturday, October 3, 2009

कोजागिरी




तू तिथे खिडकीतुन चंद्र बघशील
तेव्हा माझ्या मिटलेल्या डोळ्यांत असशील ;

चंद्रबिंद्र रोमांटिक नॉन सेंस सगळ ,
तरी माझ्या मिटलेल्या डोळ्यांत असशील ;

चंद्र नसतो कोणाच्याही बापाच्या मालकीचा,
'त्याच्या'सकट तू माझ्या डोळ्यांत असशील ;

मनापासून जगायला धैर्य लागतं ,
नक्की सांगतो , खिडकीतुन चंद्र बघशील;


जगण्याच्या नावाखाली मरणार्यना मरू दे ,
तू मात्र डोळे भरून चंद्र बघशील ;

डोळे मिटले , झोपेत नव्हे , अगदी खरं ,
माझ्यावर विश्वास ठेवून चंद्र बघशील !






No comments:

Post a Comment